Followers

Sunday 9 June 2019

सामाजिक संशोधनातील ई-लर्निंगचे महत्त्व


 

Source: https://images.app.goo.gl/JBcRapeMQJccSZo76
     सामाजिक परिवर्तनाचा अर्थ प्रतिमानित भूमिकेतील (PR) परिवर्तन वा सामाजिक संबंधाच्या जाळ्यातील परिवर्तन वा सामाजिक संरचनेतील संघटनातील परिवर्तन होय.  नव्या आर्थिक धोरणानंतर काही महत्त्वपूर्ण अशी परिवर्तन घडून आली.  ज्यामध्ये काही निश्चत मुल्य आणि संस्था यामध्ये परंपरेच्या जागेवर आधुनिकता आणि आता उत्तर आधुनिकता. 
      ज्यामध्ये शौक्षणिक व्यवस्थेतील पध्दतीमध्ये महत्त्वपूर्ण असे बदल घडून आले आहे.  माहिती तंत्रज्ञानाचा संकारात्मक असा परिणाम यावर झालेला दिसून येतो.  ज्यातून अध्ययन व अध्यापन ही प्रक्रिया अधिक सोपी व सुखर झाली आहे. या परिवर्तनाचा एक महत्त्वपूर्ण परिणाम सामाजिक संशोधनामध्ये दिसून आलेला आहे.  ई-लर्निंगमुळे सामाजिक संशोधनामध्ये काही महत्त्वपूर्ण पुढील बदल दिसून येते. ऑनलाईन पुस्तके, संशोधन ग्रंथ वा शोधनिबंध, जर्नल, मासिके, वृत्तपत्र इ. तसेच तक्तीकरण, वर्गीकरण यासाठी सूचीय माहितीची आयात-निर्यात केली जाते.  यासाठी OCLC, Web-OPAC इ.  सूचीय नोंदसंग्रहाचा उपयोग केला जाते.  संदर्भसेवा देणारी ऑनलाईन संदर्भसाधनांचा (wikipedia, शब्दकोश, विश्वकोश) वापर केला जातो.  तसेच संशोधनासाठी माहिती पुरविठ्यासाठी Open Access Journals आणि Open Archieves  चा वापर केला जातो.  याशिवाय सामाजिक संशोधनामध्ये ई-माध्यमाचा देखिल प्रभावीपणे उपयोग केला जात आहे.  तसेच संशोधनामध्ये तथ्याचे संकलन, विश्लेषण, वर्गीकरण, तक्तीकरण, ग्राप्स पारंपारिक पध्दती जाऊन सॉफ्टवेअर पॅकेजस् तंत्राच्या साह्याने केल्यास अधिक विश्वसनीय, वस्तुनिष्ठ परिणाम समोर येतात.  इतकेच नाही तर आपणास त्या त्या प्रकारचे सॉफ्टवेअर तयार करून देखिल मिळू शकतात.  ज्याचा उपयोग ऑनलाईन प्रश्नावलीसाठी करता येतो.
      अशा अनेकविध बदलाचा, सामाजिक संशोधनामध्ये ई-लर्निंगचे महत्त्व व उपयोगिता समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
[Keywords: -लर्निंग, सामाजिक परिवर्तन, सामाजिक संशोधन.]

पुर्ण वाचण्यासाठी किंवा पीडीएफ डाउनलोडसाठी येथे क्लिक करा....


Friday 26 April 2019

महिला सशक्तिकरण: शासकीय सेवेतील महिलांच्या विशेष संदर्भात

सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनातून समाजामध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. सामाजिक परिवर्तनाचा अर्थ प्रतिमानित भूमिकेतील परिवर्तन वा सामाजिक संबंधाच्या जाळ्यातील परिवर्तन वा सामाजिक संरचनेतील आणि संघटनातील परिवर्तन होय. हा परिवर्तन भारतातही घडुन आला. मात्र महिला सशक्तिकरणासंबंधी विकासामध्ये महिला (WID), महिला आणि विकास (WAD) आणि आता जेंडर आणि विकास (GID) असा दृष्टिकोण शासकीय स्तरावर दिसून येतो. अधिक पुष्ठी देणारा हा शोध निबंध आहे.

      प्रस्तुत शोधनिबंधामध्ये शासकीय महिला कर्मचाऱ्यांचे झालेले सशक्तिकरणाचा अभ्यास केला आहे. त्याचबरोबर त्यांना येणाऱ्या अडचणी व समस्यांचाही अभ्यास यामध्ये केला आहे. 

शेतकरी आत्महत्येचा सामाजिक पैलू

      भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. त्यातच महाराष्ट्र कृषी व्यवसायात आघाडीचे राज्य आहे. हा कृषी व्यवसाय निसर्गावर अवलंबून राहील्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण होवू शकत नाही त्यामुळे कर्जबाजारीपणा, विविध कौटुंबिक समस्या व प्रश्न त्यामुळे प्रमाण शुन्यतेतून आत्महत्याकडे वळतांना शेतकरी दिसून येतो. सन १९९७ ते २००६ च्या दरम्यान १,६६,३०४  इतक्या शेतकरी आत्महत्या झाल्यात. तर सन २०११ ते २०१५ मध्ये जवळपास ११,००० शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद वृत्तपत्रांनी घेतल्याची आढळून आले.
      प्रस्तुत शोधनिबंधामध्ये शेतकरी आत्महत्यांच्या सामाजिक पैलूची चर्चा केली आहे. शेतकरी आत्महत्यासंबंधी वास्तव स्थिती आणि सैध्दांतिक स्वरुप समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील शोधनिबंध हा द्वित्तीय स्त्रोतांवर अवलंबून आहे. यामध्ये शेतकरी आत्महत्यांची कारणे, सांख्यिकीय माहिती आणि विविध अहवाल याआधारे मांडणी केली आहे.

सामाजिक संशोधनातील ई-लर्निंगचे महत्त्व

  Source: https://images.app.goo.gl/JBcRapeMQJccSZo76      सामाजिक परिवर्तनाचा अर्थ प्रतिमानित भूमिकेतील (PR) परिवर्तन वा सामाजिक...