Followers

Showing posts with label ई-लर्निंग. Show all posts
Showing posts with label ई-लर्निंग. Show all posts

Sunday, 9 June 2019

सामाजिक संशोधनातील ई-लर्निंगचे महत्त्व


 

Source: https://images.app.goo.gl/JBcRapeMQJccSZo76
     सामाजिक परिवर्तनाचा अर्थ प्रतिमानित भूमिकेतील (PR) परिवर्तन वा सामाजिक संबंधाच्या जाळ्यातील परिवर्तन वा सामाजिक संरचनेतील संघटनातील परिवर्तन होय.  नव्या आर्थिक धोरणानंतर काही महत्त्वपूर्ण अशी परिवर्तन घडून आली.  ज्यामध्ये काही निश्चत मुल्य आणि संस्था यामध्ये परंपरेच्या जागेवर आधुनिकता आणि आता उत्तर आधुनिकता. 
      ज्यामध्ये शौक्षणिक व्यवस्थेतील पध्दतीमध्ये महत्त्वपूर्ण असे बदल घडून आले आहे.  माहिती तंत्रज्ञानाचा संकारात्मक असा परिणाम यावर झालेला दिसून येतो.  ज्यातून अध्ययन व अध्यापन ही प्रक्रिया अधिक सोपी व सुखर झाली आहे. या परिवर्तनाचा एक महत्त्वपूर्ण परिणाम सामाजिक संशोधनामध्ये दिसून आलेला आहे.  ई-लर्निंगमुळे सामाजिक संशोधनामध्ये काही महत्त्वपूर्ण पुढील बदल दिसून येते. ऑनलाईन पुस्तके, संशोधन ग्रंथ वा शोधनिबंध, जर्नल, मासिके, वृत्तपत्र इ. तसेच तक्तीकरण, वर्गीकरण यासाठी सूचीय माहितीची आयात-निर्यात केली जाते.  यासाठी OCLC, Web-OPAC इ.  सूचीय नोंदसंग्रहाचा उपयोग केला जाते.  संदर्भसेवा देणारी ऑनलाईन संदर्भसाधनांचा (wikipedia, शब्दकोश, विश्वकोश) वापर केला जातो.  तसेच संशोधनासाठी माहिती पुरविठ्यासाठी Open Access Journals आणि Open Archieves  चा वापर केला जातो.  याशिवाय सामाजिक संशोधनामध्ये ई-माध्यमाचा देखिल प्रभावीपणे उपयोग केला जात आहे.  तसेच संशोधनामध्ये तथ्याचे संकलन, विश्लेषण, वर्गीकरण, तक्तीकरण, ग्राप्स पारंपारिक पध्दती जाऊन सॉफ्टवेअर पॅकेजस् तंत्राच्या साह्याने केल्यास अधिक विश्वसनीय, वस्तुनिष्ठ परिणाम समोर येतात.  इतकेच नाही तर आपणास त्या त्या प्रकारचे सॉफ्टवेअर तयार करून देखिल मिळू शकतात.  ज्याचा उपयोग ऑनलाईन प्रश्नावलीसाठी करता येतो.
      अशा अनेकविध बदलाचा, सामाजिक संशोधनामध्ये ई-लर्निंगचे महत्त्व व उपयोगिता समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
[Keywords: ई-लर्निंग, सामाजिक परिवर्तन, सामाजिक संशोधन.]

पुर्ण वाचण्यासाठी किंवा पीडीएफ डाउनलोडसाठी येथे क्लिक करा....


सामाजिक संशोधनातील ई-लर्निंगचे महत्त्व

  Source: https://images.app.goo.gl/JBcRapeMQJccSZo76      सामाजिक परिवर्तनाचा अर्थ प्रतिमानित भूमिकेतील (PR) परिवर्तन वा सामाजिक...