Followers

Showing posts with label Social Factor. Show all posts
Showing posts with label Social Factor. Show all posts

Friday, 26 April 2019

शेतकरी आत्महत्येचा सामाजिक पैलू

      भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. त्यातच महाराष्ट्र कृषी व्यवसायात आघाडीचे राज्य आहे. हा कृषी व्यवसाय निसर्गावर अवलंबून राहील्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण होवू शकत नाही त्यामुळे कर्जबाजारीपणा, विविध कौटुंबिक समस्या व प्रश्न त्यामुळे प्रमाण शुन्यतेतून आत्महत्याकडे वळतांना शेतकरी दिसून येतो. सन १९९७ ते २००६ च्या दरम्यान १,६६,३०४  इतक्या शेतकरी आत्महत्या झाल्यात. तर सन २०११ ते २०१५ मध्ये जवळपास ११,००० शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद वृत्तपत्रांनी घेतल्याची आढळून आले.
      प्रस्तुत शोधनिबंधामध्ये शेतकरी आत्महत्यांच्या सामाजिक पैलूची चर्चा केली आहे. शेतकरी आत्महत्यासंबंधी वास्तव स्थिती आणि सैध्दांतिक स्वरुप समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील शोधनिबंध हा द्वित्तीय स्त्रोतांवर अवलंबून आहे. यामध्ये शेतकरी आत्महत्यांची कारणे, सांख्यिकीय माहिती आणि विविध अहवाल याआधारे मांडणी केली आहे.

सामाजिक संशोधनातील ई-लर्निंगचे महत्त्व

  Source: https://images.app.goo.gl/JBcRapeMQJccSZo76      सामाजिक परिवर्तनाचा अर्थ प्रतिमानित भूमिकेतील (PR) परिवर्तन वा सामाजिक...